अन्न हे पुर्ण ब्रह्म : भुसावळातील इनरव्हील क्लबतर्फे जनजागृती
भुसावळ : लग्न समारंभात वाया जाणारे अन्न व अन्नाची नासाडीबाबत भुसावळातील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे प्रभावी जनजागृती अध्यक्षा शीतल भराडे यांच्या नेतृत्वाखाली केली जात आहे. अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने त्याची नासाडी टाळण्याचे आवाहन शहरातील बालाजी लॉन, स्टार लॉन्स, आदित्य लॉन्स, हॉटेल मल्हार, मनुमाता भरीत सेंटर या ठिकाणी बॅनर लावून करण्यात आली. प्रत्येक समस्यांबद्दल जागृती निर्माण करू आणि असेच बॅनर आवश्यक ठिकाणी लावू, असे क्लब अध्यक्षा शीतल भराडे यांनी सांगितले. प्रसंगी सचिव रूचिका शर्मा, उपाध्यक्ष वंदिता पारे, माजी अध्यक्षा आरती चौधरी, खजिनदार कांचन जोशी, जयश्री दवे, सदस्य प्राची राणे उपस्थित होत्या. दरम्यान, या उपक्रमासाठी स्टार लॉन्सचे गोपाळ चौधरी, बालाजी लॉन्सचे संजय लाहोटी, आदित्य लॉन्सवे बबलु महाराज, हॉटेल मल्हारचे निखील धनगर, मनुमाताच्या शैला वाघुळदे यांचे सहकार्य लाभले.

