श्री विसर्जनासाठी जाणार्या भाविकांच्या रीक्षाला अपघात : चौघे गंभीर
समोरून वाहन अंगावर आल्याने अॅपे रीक्षा पडली खड्ड्यात : देवगावजवळील घटना : चौघेही जखमी धानोर्यातील रहिवासी
जळगाव : अॅपे रीक्षातून श्री विसर्जनासाठी जाणार्या भाविकांच्या वाहनाला चोपडा तालुक्यातील देवगावजवळ अपघात होवून चौघे जखमी झाले. चौघांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शुक्रवारी हा अपघात झाला.
वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील देवा मित्र मंडळ ग्रुपच्या गणेशोत्सवाच्या आज पाचव्या दिवशी गणपती विसर्जनासाठी मालवाहू अॅपेरीक्षात गणपती ठेवून तापी नदीवर विदगावला जात असताना देवगावजवळ समोरून येणारे भरधाव वाहन अंगावर आल्याने अॅपे चालक राहुल प्रकाश कोळी यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याखाली असलेल्या खड्ड्यात जावून उलटले. या अपघातात किरण प्रल्हाद पाटील (17), अक्षय नाना कोळी (15), अमोल राजू गुजर (19) आणि गोविंदा सुरा कोळी (12, सर्व रा.धानोरा, ता.चोपडा) हे चौघे गंभीर जखमी झाले. चौघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.