!-- afp header code starts here -->

अखेर विक्रम लँडरचा लागला शोध


मुंबई : सॉफ्ट लँडिंगदरम्यान विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर आता ऑर्बिटरला विक्रम लँडरचा शोध लागला लागल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ‘आम्हाला चंद्राच्या पृष्टावर असणार्‍या विक्रम लँडरविषयीची माहिती मिळाली आहे आणि ऑर्बिटरने त्याचं थर्मल छायाचित्रही काढलं आहे. पण, अद्यापही पुढील संपर्क झालेला नाही’, असं सीवन म्हणाले. आमची टीम यावर लक्ष ठेवून आहे, शिवाय आपण लँडरशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे येत्या काळात लवकरच संपर्क होईल, असा विश्वासही त्यांनी दिला. सीवन यांनी दिलेल्या या माहितीमुळे अंतराळ विश्वात एक नवी उमेद पाहायला मिळत आहे. आता सार्‍या देशाचं आणि विश्वाचंही लक्ष इस्रोकडून येत्या काळात मिळणार्‍या अधिकृत माहितीकडे लागलं आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !