भुसावळातील आरएफ वीज मीटर न हटवल्यास कार्यकारी अभियंत्यांना बांगड्यांचा आहेर


भुसावळात नागरीकांचे उत्तर महाराष्ट्र कामगार संघटनेच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण

भुसावळ- नागरीकांकडे आरएफ वीज मीटर काढून पूर्वीचे मिटर बसवावे, वाढीव बिले कमी करावीत आदी मागण्यांसाठी सोमवारी प्रातांधिकारी कार्यालयासमोर पीडीत वीज ग्राहकांनी उत्तर महाराष्ट्र कामगार संघटनेच्या माध्यमातून लाक्षणिक उपोषण केले. यावेळी प्रांताधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

लाक्षणिक उपोषणात वीज ग्राहकांचा सहभाग
महावितरण कंपनीने शहर आणि विभागात नवीन आरएफ वीजमीटर बसवून ग्राहकांची डोकेदुखी वाढवली आहे शिवाय या मीटरमुळे अतिरीक्त वीज बिले येत असल्याने ग्राहक वैतागले आहेत, आरएफ वीज मीर काढून पूर्वीचे मीटर बसवावे, वाढीव बिले कमी करावीत आदी मागण्यांसाठी सोमवारी उत्तर महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण झाले. या उपोषणात शहर आणि परीसरातील वीज ग्राहक सहभागी झाले. यानंतरही दखल न घेतल्यास कार्यकारी अभियंत्यांना बांगड्यांच्या अहेर देवू, असा संतप्त इशारा अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांनी दिला.

यांचा लाक्षणिक उपोषणात सहभाग
यावेळी महिला अध्यक्ष संध्या चित्ते, लक्ष्मण दगडू कोल्हे, मनोहर चौधरी, यशवंत बालक, मनोहर सोनार, अशोक लोखंडे, एन. डी. खरे, दीपक नाथ, अशोक मावळे, प्रवीण भावसार, रंजना पाटील, ताराबाई माळी, नितीन पटाव, विवेक नरवाडे, पंढरीनाथ दामोदरे यासह लक्ष्मीनारायण नगर, देना नगर, दीनदयाल नगर, आयोध्या नगर, काशीराम नगर, खळवाडी, जुना सातारा, न्यू सातारा आदी भागातील असंख्य वीज ग्राहक उपस्थित होते.


कॉपी करू नका.