आदर्श शिक्षक शेख जावेद यांना राज्यस्तरीय उड़ान पुरस्कार प्रदान


यावल- शैक्षणिक क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान देणारे तसेच समाजसेवेसाठी सदैव तत्पर राहणारे यावल निवासी शेख जावेद शेख याकूब यांना अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे उडान हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर सैय्यद एजुकेशन सोसायटी साकळी संचालित सर सैयद अहमद खान उर्दू प्रायमरी शाळेचे ते शिक्षक आहेत. जावेद शेख याकूब यांना 8 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे हा पुरस्कारमिस इंडिया सौंम्या मंगलानी व पद्मश्री विजय कुमार शाह यांच्या हस्ते देवून गौरवण्यात आले. कला जीवन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष युवराज ठाकरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.


कॉपी करू नका.