जामुनझिर्‍याच्या विवाहितेला सर्पदंश


यावल : सातपुड्यातील जामुनझिरा या आदिवासी पाड्यावरील एका 27 वर्षीय विवाहितेला सर्प दंश झाल्याने अत्यवस्थ अवस्थेत यावल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. सयाबाई साईराम बारेला (27) ही विवाहिता शेतात निंदणी करण्यासाठी गेली असताना तिच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. ही घटना लक्षात येताच तिला यावल रुग्णालयात दाखल केले. डॉ.एन.डी.महाजन, अधिपरीचारीका नीलिमा पाटील, संजय जेधे आदींनी उपचार केले. विाहितेची प्रकृती अधिक खालावल्याने तिला तत्काळ जळगाव येथे हलवण्यात आले.


कॉपी करू नका.