मूकबधीर इसमाचा मोर नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू
यावल : तालुक्यातील बामणोद येथील मूळ रहिवाशी व हल्ली कोसगावला गुरेचराई करणार्या एका 45 वर्षीय मुकबधीर इसमाचा मोर नदीच्या पात्रात पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. प्रवीण प्रभाकर नेमाडे (45) असे मृताचे नाव आहे. प्रवीण प्रभाकर नेमाडे हे मूळ बामणोदचे रहिवासी असलेतरी कोसगाव येथे मावशीकडे रहावयास होते. मूक बधीर असलेले प्रवीण हे गुरे चराई करून गुजराण करीत होते. मंगळवारी तो दुपारी गावालगत मोर नदीच्या पात्राजवळ गुरे चराई करताना काही गुर – ढोरं नदी पात्रात उतरत होती त्यांना थांबवण्यास गेले असता त्यांचा पाय घसरला व ते नदी पात्रात वाहत्या पाण्यात वाहून गेले. ही घटना जवळ शेतात काम करणार्या शेतमजुरांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पुढे जाऊन त्याला पकडले मात्र तोवर तो गतप्राण झाला. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉ. एन. डी.महाजन यांनी शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या नातलगांच्या ताब्यात दिला. मयत नेमाडे हा साळशिंगी, ता.बोदवड येथील शिक्षिका कुसुम रमेश नेमाडे व सेवा निवृत्त शिक्षक रमेश टोपलू नेमाडे यांचा पुतण्या होय.