मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून ईगतपुरी-मनमाड सेक्शनचे निरीक्षण


थोड्याच वेळात जी.एम.स्पेशल भुसावळात होणार दाखल

भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल हे शुक्रवारी भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर आले असून दिवसभरात त्यांनी इगतपुरी ते मनमाड सेक्शनचे निरीक्षण केले तसेच नाशिक, मनमाड रेल्वे स्थानकांची पाहणी केली. मनमाड रेल्वे स्थानकाचे इन्पेक्शन केल्यानंतर त्यांनी रेल्वे स्कूल एक्झीबीशनला हजेरी लावली. सायंकाळी सात वाजता जी.एम.स्पेशल ट्रेनचे भुसावळात आगमन होणार असून त्यांनी मित्तल यांच्या हस्ते जी.एम.अ‍ॅवॉर्डचे वितरण होणार आहे व त्यानंतर सव्वा सात वाजता ते प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधतील. जी.एम.यांच्या सोबत डीआरएम विवेककुमार गुप्ता , सिनी.डीसीएम, सिनी डीओएफ, पीटीसीएम तसेच रेल्वे अधिकारीवर्ग उपस्थित आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !