भुसावळात उपनगराध्यक्ष पदासाठी 22 रोजी विशेष सभा


भाजपा नगरसेवक रमेश नागराणी यांना संधी मिळण्याची शक्यता

भुसावळ : नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा शे.सईदा शफी यांच्या राजीनाम्यानतर नूतन उपनगराध्यक्ष निवडीसाठी 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींगव्दारे विशेष सभेचे होत आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपा नगरसेवक रमेश नागराणी यांचे नाव चर्चेत असून त्यांना प्रथम संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधारी गटाने पाच वर्षात पाच नगरसेवकांना उपनगराध्यक्षपदाची संधी देण्याचे ठरवले होते. त्यात युवराज लोणारी, लक्ष्मी मकासरे, शे. सईदा शफी यांना संधी मिळाली मात्र आता अखेरच्या वर्षात पाच जणांना संधी देण्याचे नियोजन सत्ताधार्‍यांनी केले आहे. सध्या रमेश नागराणी, प्रमोद नेमाडे, निर्मल कोठारी, राजेंद्र नाटकर, सोनी बारसे आदींना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सभा बोलविण्यात आली आहे. पीठासीन अधिकारी म्हणून भुसावळचे तहसीलदार दीपक धीवरे हे असतील. सकाळी दहा ते 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन देणे व स्विकारले जाईल तर 12 वाजून 30 मिनिटांनी नामनिर्देशनपत्राची छाननी होईल. छाननीनंतर वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांनी नावे घोषित केली जातील तर 12.30 ते 12.45 दरम्यान माघारी होईल. एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असतील तर आवश्यकतेनुसार उपाध्यक्षपदी निवड व निकाल दिला जाईल, असा वेळापत्रक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !