तलवार बाळगून दहशत : बाळा मोरे यास एक वर्ष कारावासाची शिक्षा


भुसावळ : शहरातील रेल्वे वसाहतीत नरेंद्र उर्फ बाळा अरुण मोरे (30, 40 बंगला, रेल्वे वसाहत, भुसावळ) हा रेल्वे वसाहत परीसरात 4 ऑगस्ट 2017 रोजी तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखा व भुसावळ शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली हो शिवाय त्याच्या ताब्यातून तलवार जप्त केली होती. आरोपीविरुद्ध भुसावळ न्यायालयात न्या.एस.वाय.सुळ यांच्या न्यायासनापुढे दोषारोपप सादर करण्यात आल्यानंतर आरोपीस दोषी ठरवत एक वर्ष कठोर कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.अनिल चुकेवाड यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणाचा तपास हवालदार वसंत लिंगायत यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून सहा.फौजदार आसीफ खान व सुनील खोडपे यांनी काम पाहिले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !