रीपाइं जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
भुसावळ : माजी नगरसेवक तथा आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांचा शनिवारी वाढदिवस असल्याने विविध क्षेत्रातील पदाधिकार्यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोन, सोशल मिडीयावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कोरोनाच्या कठीण काळात राजू सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी तथा नगरसेवका पूजा राजू सूर्यवंशी यांनी अनेक गोरगरीब कुटूंबांना मदतीचा हात देत त्यांना धीर दिला होता.
सायंकाळी करणार शुभेच्छांचा वर्षाव
शनिवारी सायंकाळी सहा ते आठ दरम्यान संभाजी नगर, वरणगाव रोडवरील निवासस्थानी राजूभाऊ सूर्यवंशी हे चाहत्यांसह कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.



