भुसावळात विवाहितेची आत्महत्या : आरोपी पतीला जामीन
भुसावळ : शहरातील महेश नगरातील सोनाली अनिल गाळफाडे (28 या विवाहितेने 26 ऑक्टोबर 2020 रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेचा पती अनिल गाळफाडे यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आरोपीला शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. संशयीत आरोपीतर्फे अॅड.भुपेश बाविस्कर यांनी काम पाहिले.


