जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह समस्या सोडवण्याबाबत मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना साकडे


भुसावळ भेटीवर आलेल्या संजीव मित्तल यांना रेल्वे कामगार संघटनेचे निवेदन

भुसावळ : डीआरएम कार्यालयाबाहेरील मुख्य प्रवेशद्वारावर छत्रपत्री शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध समस्या सोडवण्यासंदर्भात मध्य रेल्वे सरव्यवस्थापक संजीव मित्तल यांना शुक्रवारी रेल्वे कामगार संघटना पदाधिकार्‍यांनी साकडे घातले. मित्तल हे शुक्रवारी भुसावळ दौर्‍यांवर आले असता पदाधिकार्‍यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. य2ावेळी रेल्वे कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, अरविंद थोरात, राजू कापडे, बत्रा यांनी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

विविध मागण्यांबाबत चर्चा
याप्रसंगी मित्तल यांच्याकडे 10:40 व ऑन रीक्वेस्ट ट्रॅकमॅन यांना पीओएचसाठी सोडावे, एमओएच वर्कशॉप की रनिंग शेड ? घोषित करावे, पीओएचसह सर्व विभागासाठी लार्जेस स्किम लागू करावी, पीडब्ल्यूआय, आयओडब्ल्यू, एसएसई यांची चार वर्षानंतर नियमानुसार बदली करावी, रेल्वे दवाखाना येथे रुग्णासाठी अतिरीक्त आरक्षण खिडकी सुरू करावी, सर्व विभागातून एलडीसीई-जीडीसीई परीक्षा नेहमी घेणे, कामगारांना रात्र ड्यूटी भत्ता, यात्रा भत्ता, महागाई भत्ता द्यावा, रेल्वे कर्मचार्‍याचे कोरोनामुळे निधन झाल्यास त्याला 50 हजार रुपये अनुदान द्यावी, पॅसेंजर लोको पायलट व पॅसेंजर गार्ड यांच्याकडून मालगाडीचे नियमबाह्य कार्य बंद करावे आदी मागण्यांचे निवेदन देवून चर्चा करण्यात आली. यावेळी राजेश लखोटे, कमलाकर बाणाईत, के.के.रावत, सचान, फिरोज खान यांच्यासह महागठबंधनचे पदाधिकारी हजर होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !