वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाभर’ किसान बाग’ आंदोलन
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पाऊल : भुसावळात उद्या बैठक
भुसावळ : केंद्र शासनाने पारीत केलेले अन्यायकारक तीन कृषी विधेयक कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी संपूर्ण राज्यात 27 जानेवारी 2021 रोजी शाहीन बाग आंदोलनाच्या धर्तीवर किसान बाग आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा (पुर्व) जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृहात होत आहे.
यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीत मार्गदर्शन प्रदेश सदस्य शमिभा पाटील, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, युवा आघाडीचे बाळा पवार, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा सदस्य सलिम शेख, हाजी मुश्ताक मार्गदर्शन करतील. किसान बाग आंदोलन लक्षवेधी होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सचिव संजय सुरडकर, जिल्हा सचिव दीपक मेघे, सचिन बार्हे यांनी केले आहे.



