चार हजारांच्या रोकडसह पर्स लांबवली
भुसावळ : एलटीटी-रांची एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाची चार हजारांची रोकड असलेली पर्स लांबविल्याची चोरट्याने लांबवली. शुक्रवारी मनमाड रेल्वे स्थानकाजळ घडली. मीनल प्रफुल्ल धोटे (रा. बैतुल, मध्य प्रदेश) या मनमाड ते इटारसी असा प्रवास गाडीच्या एस-4 या डब्यातील सीट 2, 3, 4 व 5 वरून कुटुंबासह करीत असताना झोप लागल्याची संधी चोरट्याने साधत पर्स लांबवली. शुक्रवारी ही घटना मनमाड रेल्वे स्थानकावरून गाडी सुटल्यावर घडली. पर्समध्ये चार हजारांची रोकड एटीएम कार्डसह अन्य साहित्य होते. भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो मनमाडला वर्ग करण्यात आला.


