भुसावळात एकावर लोखंडी रॉडने वार


भुसावळ : भाजी बाजारात भाजी विक्रेत्याने लहान मुलास बाजूला सरक म्हटल्याचा राग आल्याने वाद हावून एकाच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3.20 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर घडली. संतोष राजेंद्र शर्मा (रा.कवाडे
नगर, भुसावळ) हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील भाजी बाजारात गेले होते. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या एक मुलास त्यांनी बाजूला सरक असे म्हटल्याचे चौधरी नामक व्यक्तीला राग आल्याने शर्मा व चौधरी यांच्यात वाद झाले. याच वेळी चौधरी यांनी शर्मा यांच्या
डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. शर्मा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौधरी नामक व्यक्तीविरूद्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !