भुसावळात शेतकरी विरोधातील बिल जाळून निषेध
दिल्लीतील आंदोलनात जाणार्या आंदोलकांनाही निरोप
भुसावळ : दिल्लीतील किसान आंदोलनाचा 51 दिवस असून देशभरातील शेतकरी तसेच आदिवासी महिला शनिवारी दुपारी गोवा एक्सप्रेसने दिल्लीकडे रवाना झाले. याप्रसंगी आंदोलकांन निरोप देण्यात आला तसेच रेल्वे स्थानकाजवळील शिवाजी पुतळ्याजवळ मोदी सरकारने पारीत केलेल्या शेतकरीविरोधातील बिलांची होळी करून निषेध करण्यात आला.
भुसावळातून एक हजार आंदोलक दिल्लीकडे रवाना
कर्नाटक एक्सप्रेसने 150, सचखंडने 200 तसेच पंजाब मेल व झेलम एक्सप्रेसने सुमारे एक हजार शेतकरी तसेच आदिवासी महिला व युवक हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती लोकसंघर्षचे सचिन धांडे व चंद्रकांत चौधरी यांनी दिली. शेतकरी व आदिवासी हे जिल्ह्यातील उसमळी, गाढर्या, जामन्या, हळखेडा, लाल गोटा, पाल आदी गावातून रवाना झाले. कामगार, महिला, युवक मोठ्या कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर बसून लोकशाही मार्गाने, शांततेत शेती विरोधी तीन कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करीत आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी खान्देशमधील जवळपास 1200 आदिवासी, महिला, शेतकरी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली रेल्वे आरक्षण करून शांततेत भुसावळ, जळगाव, चाळीसगाव येथून सहभागी होण्यासाठी रवाना झाले. यावेळी 15 रोेजी सकाळी दहा वाजता शिवाजी पुतळ्याजवळ त्यांना सलीम शेठ चुडीवाला, सचिन धांडे हिरवी झेडी दाखवुन निरोप दिला व त्यानंतर शेती व कामगार विरोधी बिलांची जाळून होळी करण्यात आली. लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, चंद्रकांत चौधरी, राख कामगार नेते हेमंत पाटील, विल्हाळे ग्रा.पं.सदस्य गोटू पाटील, शे.नुरोद्दीन, किरण मिस्तरी, संतोष भगत, संजय पाटील आदी उपस्थित होते.



