एमओएच शेड अधिकारी हिमांशू रामदेव यांचा जीएम पुरस्काराने सन्मान
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई कार्यालयाद्वारे मध्य रेल्वेत उत्कृष्ट कार्य करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांना नुकतेच सरव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याहस्ते नुकतेच सन्मानीत करण्यात आले. त्या भुसावळ मंडळ येथील एमओएच (टीआरएस) शेडचे अधिकारी तथा सिनियर डीईई हिमांशू रामदेव यांना त्यांच्या शेडमध्ये सर्वोत्कष्ट योगदान, अथक परीश्रम आणि उल्लेखनीय कार्याबद्दल महाप्रबंधक संजीव मित्तल व डीआरएम विवेक कुमार गुप्ता, मुख्य कार्मिक अधिकारी मंजूला सक्सेना यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी भुसावळ विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते. हिमांशू रामदेव यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


