मुंबई-नागपूरसह अहमदाबाद व पुण्यासाठी तीन विशेष गाड्या धावणार


भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरीक्त तीन विशेष प्रवासी गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर व नागपूर-अहमदाबाद या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. संपूर्णपणे आरक्षित असलेल्या या गाड्यांमध्ये केवळ आरक्षीत तिकीट असलेल्या रेल्वे प्रवाशांना प्रवेश दिला जाणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे प्रवाशांना पालन करावे लागणार आहे.

मुंबई-नागपूर विशेष गाडी
डाऊन 02169 मुंबई-नागपूर विशेष गाडी 21 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मुंबईहून दररोज 2.55 वाजता रवाना झाल्यानंतर नागपूरला दुसर्‍या दिवशी 5.45 वाजता पोहोचणार आहे. अप 02170 नागपूर-मुंबई विशेष गाडी 20 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत नागपूरहुन दररोज 9.10 वाजता रवाना झाल्यानंतर मुंबईला दुसर्‍या दिवशी 12 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला देवळाली, नाशिक, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मुर्तीजापूर, बडनेरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


नागपूर-अहमदाबाद विशेष साप्ताहिक गाडी
अप 01137 नागपूर-अहमदाबाद विशेष गाडी 20 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत नागपूरहून दर बुधवारी 8.15 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी अहमदाबादला 12.35 वाचता पोहोचणार आहे. डाऊन 01138 अहमदाबाद-नागपूर विशेष गाडी 21 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत अहमदाबादहुन दर गुरुवारी 6.30 वाजता रवाना होईल आणि दुसर्‍या दिवशी नागपूरला 10.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

नागपूर-पुणे सुपरफास्ट एसी विशेष एक्स्प्रेस
अप 02114 नागपूर-पुणे एसी विशेष गाडी 19 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत नागपूरहून दर मंगळवार, शुक्रवार, रविवारी सहा वाजता रवाना होईल आणि दुसर्‍या दिवशी पुण्याला 9.05 वाचता पोहोचेल. डाउन 02113 पुणे-नागपूर एसी विशेष गाडी 20 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत पुण्याहून दर बुधवार, शनिवार, सोमवारी 5.40 वाजता रवाना होईल आणि दुसर्‍या दिवशी नागपूरला 9.10 वाचता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !