वंचित बहुजन संघटना आता किसान बाग आंदोलन करणार


भुसावळ : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीन बाग धर्तीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे किसान बाग आंदोलनाचे रणशिंग फुंकले असून त्या आंदोलनाच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामगृहात रविवारी दुपारी एक वाजता करण्यात आले होते. आज देशाचा पोशिंदा संकटात सापडला आहे त्याला संपवण्यासाठी केंद्र सरकारने तीन काळे कायदे जबरदस्तीने लादलेले आहेत त्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी किसान बाग आंदोलनांची हाक दिली आहे. या आंदोलनासाठी मुस्लिम समाज पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीन बाग आंदोलनांच्या धर्तीवर 27 जानेवारी रोजी ‘किसान बाग’ आंदोलन करण्यात येणार आहे.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे होते. बैठकीस भारीप जळगाव पश्चिम अध्यक्ष प्रमोदजी इंगळे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा पदाधिकारी हाजी मुस्ताक, युवा आघाडीचे बाळा पवार, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, महेंद्र सुरडकर, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा संगीता भामरे, जिल्हा सदस्य अरुण तायडे, जिल्हा कोष्याध्यक्ष अरुण नरवाडे, वंदना सोनवणे, आय.टी.जिल्हा प्रमुख सचिन बार्‍हे, बोदवड तालुका अध्यक्ष सुपडा निकम, जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, संतोष कोळी, रहेमान पिंजारी, मो.तैफुर कादरी, राजेंद्र बारी, विद्यासागर खरात, बंटी सोनवणे, सुरेश अटकाळे, कांतीलाल गाढे, निलेश जाधव, गणेश इंगळे तालुका सचिव, शिवाजीराव टेंभुर्णीकर, रमेश तायडे, देवदत्त मकासरे, राजेश गवळी, अक्षय निराले, सुरेश अटकाळे, दिलीप क्षीरसागर, रवींद्र कोळी, रुपेश कुर्‍हाडे, शुभम सोयंके, प्रमिला बोदडे, पवन सोनवणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !