बाळा मोरे यांच्या शिक्षेला जिल्हा न्यायालयाकडून स्थगिती
भुसावळ : शहरातील रेल्वे वसाहतीत नरेंद्र उर्फ बाळा अरुण मोरे (30, 40 बंगला, रेल्वे वसाहत, भुसावळ) यांना तलवार बाळगल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजारांचा दंड सुनावण्यात आला होता. या शिक्षेच्या निकालाविरोधात मोरे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते. 18 रोजी अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायासनापुढे या अपिलावर सुनावणी झाल्यनंतर आरोपीला सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयाने पारीत केले. बाळा मोरे यांच्यातर्फे अॅड.सुनील हंसराज पगारे यांनी काम पाहिले.


