भुसावळात तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींवर ‘वंचित बहुजन आघाडी’चा राहणार ‘कंट्रोल’


जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंच्या सोशल इंजिनिअरिंग प्रयोगाला मोठे यश

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीनंतर सोमवारी लागलेल्या निकालात अनेक ग्रामपंचायतींमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी यश मिळवले. जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी आखलेली यशस्वी रणनीती व पक्षाध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न म्हणून नावारूपास आणलेला आणि यशस्वी केलेला सोशल इंजिनिअरींगचा फार्मुला सक्सेस झाल्याचे दिसून आले. अनेक ग्रामपंचायतीत वंचितचे पॅनल निवडून आले असून काही ठिकाणी सदस्य निवडून आल्याचे सोनवणे यांनी कळवले आहे.

प्रथमच वंचित आघाडी ग्रा.पं.निवडणुकीत
पहिल्यांदा वंचित आघाडीने ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या व त्यात प्रचंड यश मिळाल्याचे दिसून आले. विनोद सोनवणे म्हणाले की, मिळालेला विजय हा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास आणि वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेली मेहनतीचे फळाचा आहे. जनतेने टाकलेल्या विश्वासाचे आम्ही सोनं करू, असेही ते म्हणाले.


यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, बालाजी पठाडे (पिंप्रीसेकम), सचिन वानखेडे (फेकरी), योगेश सावळे (बोहर्डी), सिध्दार्थ सपकाळे (ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव), अरुण तायडे, अरुण नरवाडे, संगीता भामरे, तालुका सचिव गणेश इंगळे, विद्यासागर खरात व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !