चोरीच्या पाच दुचाकी जप्त : फैजपूर पोलिसांची कामगिरी


अंजाळेतील अल्पवयीन बालकांनी केली चोरी : गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

फैजपूर : फैजपूर पोलिस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरीच्या तपासात पोलिसांनी अंजाळे येथील दोघा अल्पवयीन बालकांची खोलवर चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून चोरी केलेल्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. पाचही दुचाकी बामणोद परीसरातून चोरल्याची कबुली संशयीतांनी पोलिसांना दिली. सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अल्पवयीन बालकांनी लांबवल्या दुचाकी
अंजाळे गावातील दोघा अल्पवयीन बालकांच्या हिरो होंडा (एम.एच 19 बी.एफ. 7820), (एम.एच 19 सी.ए.7351), (एम.पी.68 एम.ई 3282), विना क्रमांकाची फॅशन प्रो व हिरो होंडा सुपर स्प्लेंडर जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे, पोलिस उपनिरीक्षक मसुलोद्दीन शेख, रोहिदास ठोंबरे, हेमंत सांगळे, देविदास सुरदास, किरण चाटे, महेश वंजारी, उमेश सानप, अनिल महाजन, चेतन महाजन आदींनी केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !