समता नगरातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव : शहरातील समतानगर येथील रवींद्र हरी जगताप (32) या तरुणाचा 19 रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रवींद्र जगताप यास दारु पिण्याचे व्यसन होते. यादरम्यान लिव्हर खराब होवून प्रकृती बिघडल्याने त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना 19 रोजी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांच्या खबरीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील, पोलिस कॉन्स्टेबल चेतन अहिरे हे करीत आहेत.


