अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण : एकाविरुद्ध पोस्कोचा गुन्हा
भुसावळ : अल्पवयीन मुलीशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख वाढवत तिच्या व्हॉटसअॅपवर अश्लील फोटो पाठवून तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात पोस्को अन्वये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका भागातील अल्पवयीन पीडीतेची आरोपीशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर आरोपीने ओळखीचा फायदा घेत तिच्या व्हॉटसअॅपर अकाऊंटवर अश्लील छायाचित्र पाठवल्याचा आरोप आहे. रवीकुमार (पूर्ण, नाव, गाव माहित नाही) या आरोपीविरुद्ध पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक संदीप डुणगहू करीत आहेत.


