झाशीची राणी महिला मंडळाची कार्यकारिणी जाहीर


अध्यक्षपदी सुनीता अनिल चौधरी तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री हर्षल बाविस्कर,

भुसावळ : जळगावच्या शिवाजी नगरातील खडके चाळ येथे झाशीची राणी महिला मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी सुनीता अनिल चौधरी, उपाध्यक्षपदी भाग्यश्री हर्षल बाविस्कर, सरचिटणीसपदी रंजना डिगंबर कोळी, सचिवपदी वैशाली चंद्रकांत इंगळे तर सदस्य म्हणून कविता संतोष सोनवणे, आशा मनोज मोरे, अलका संजय मिस्तरी, वर्षा मंगल पाटील, शोभा अशोक झुंजारराव, भारती दिलीप सोनवणे, नंदा युवराज सोनवणे, रेखा प्रदीप तायडे, वंदना नारायण रायसिंगे यांचा समावेश आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून झाशीची राणी महिला मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.

नूतन कार्यकारीणीचा सत्कार
नवनिर्वाचित कार्यकारीणीचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. महिला मंडळ स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर वृक्षारोपण करण्यात आले व त्याला वाढवण्याची जबाबदारीदेखील महिला मंडळाने घेतली. त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक महिलांची उपस्थिती होती. झाशीची राणी महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. सूत्रसंचालन सचिव वैशाली चंद्रकांत इंगळे यांनी तर आभार अध्यक्ष सुनीता अनिल चौधरी यांनी मानले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !