यावलला विषय समिती सभापतीपदावर महिलांची वर्णी
यावल : यावल नगरपरीषदेच्या विषय समिती सभापती निवडीसाठी बुधवारी निवड झाली. विषय समिती सभापतीपदावरदेखील महिलांचीच वर्णी लागली. पीठासीन अधिकारी यावलचे तहसीलदार महेश पवार, मुख्याधिकारी बबन तडवी, नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
विषय समिती असे- सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी कल्पना दिलीप वाणी, शिक्षण समितीच्या सभापतीपदी रेखा युवराज चौधरी, आरोग्य वैद्यक व स्वच्छता समिती सभापतीपदी शमशाद बेगम महम्मद खान, महिला व बालविकास समितीच्या सभापतीपदी सईदाबी शेख हारूण यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध सभापती नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी, उपनगराध्यक्ष रूख्माबाई नथ्थू भालेराव असतील. समिती सदस्य म्हणून कल्पना दिलीप वाणी, रेखा युवराज चौधरी, शमशाद बेगम महम्मद खान, सईदाबी शेख हारूण हे असतील.

यांची बैठकीस उपस्थिती
विशेष सभेस नगरसेवक व माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील, नगरसेवक प्रा.मुकेश पोपटराव येवले, नगरसेवक अस्लम शेख नबी, नगरसेवक सैय्यद युनूस सैय्यद युसूफ, पौर्णिमा राजेंद्र फालक, शीला श्रीधर सोनवणे, मनोहर सोनवणे उपस्थित होते. यावल शहरातील विस्तारीत क्षेत्रातील नागरीकांच्या विविध प्रलंबित समस्या व विकासकामांकडे अग्रक्रमाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नगरवासीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


