फेकरी ग्रा.पं.च्या निवडणुकीत प्रभाग एकमध्ये वंचितचे पॅनल विजयी
भुसावळ : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील फेकरी येथे प्रभाग एकमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तीन सदस्य निवडून आले आहेत. प्रभाग एकमधून संदीप सुरेश निकम (अनु.जाती), आशा सुनील आवरे (ओ.बी.सी.महिला), जयश्री संजय वाघ (सर्वसाधारण महिला) आदी सदस्य निवडून आले आहेत. मतदारांनी टाकलेला विश्वास आमचे सर्व सदस्य सार्थ ठरवतील, असा विश्वास जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करून पदाधिकार्यांनी जल्लोष केला.


