भुसावळात विषय समिती सभापती बिनविरोध
भुसावळ : पालिकेत बुधवारी विषय समिती सभापती निवडीसाठी झालेल्या विशेष सभेत सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक धीवरे होते. सभेनंतर नवनियुक्त सभापतींचा तहसीलदार धिवरे व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी सत्कार केला. समिती सभापती असे- बांधकाम समिती सभापतीपदी भाजपचे गटनेते मुन्ना तेली, शिक्षण समितीवर मुकेश गुंजाळ, स्वच्छता व वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीवर प्रा.दिनेश राठी, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीवर किरण कोलते, नियोजन आणि विकास समितीवर पदसिध्द उपनगराध्यक्ष शे.सईदा शफी, महिला व बालकल्याण समितीवर अरुणा सुरेश सुरवाडे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. सन 2016 मध्ये झालेल्या पालिका निवडणूकीत जनआधारच्या गटाकडून निवडून आलेल्या व दोन, तीन वर्षांपासून सत्ताधारी भाजपच्या गटात सहभागी झालेल्या प्रभाग तीनच्या नगरसेविका अरुणा सुरवाडे यांना महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतीपदाची संधी मिळाली आहे.



