कोरोनामुळे शाळेचे शुल्क माफ करावे


ताप्ती स्कूलच्या पालकांची संस्थाध्यक्षांकडे मागणी

भुसावळ : कोरोनामुळे उत्पन्नावर पाणी फिरल्यामुळे संसाराचा गाडा हाकणे हाकणे कठीण झाल्याने ताप्ती पब्लिक स्कूलने यंदाचे शैक्षणिक वर्षातील शुल्क माफ करावे, अशी मागणी पालकांनी बुधवारी निवेदनाव्दारे प्राचार्या नीना कटलर व संस्थाध्यक्ष मोहन फालक यांच्याकडे केली. सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मिळाल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी ताप्ती पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी सायंकाळी हुडको भागातील रानातला महादेव मंदिर आवारात बैठक घेवून सक्तीने होणारी शुल्क वसूली थांबवावी या संदर्भात चर्चा करून निवेदन देण्याचे ठरले होते.

शिष्टमंडळाने दिले निवेदन
बुधवारी पालकांच्या शिष्टमंडळातील विष्णू बुगले, भुषण वाणी, सुनील सुरळकर, मनोज मेढे आदींसह अन्य पालकांनी प्राचार्या नीना कटलर व संस्थाध्यक्ष मोहन फालक यांच्यासोबत चर्चा केली. सध्या इयत्ता नववी ते दहावीचे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग सध्या बंद आहेत. यंदा शाळा बंद असल्याने संस्थेला अनेक सुविधांसाठी होणार खर्च करावा लागला नाही. कारेाना महामारीमुळे पालकांची आर्थिक स्थिती बिकट आहे. बर्‍याच पालकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागत आहे. यामुळे ताप्ती पब्लिक स्कूले यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शुल्कात सवलत द्यावी तसेच चालू व आगामी वर्षाच्या शैक्षणिक शुल्क जमा करण्याबाबत सक्ती करु नर्येें अशी मागणी केली. यावर प्राचार्य कटलर व संस्थाध्यक्ष फालक यांनी संपूर्ण मॅनेजमेंट सोबत चर्चा करुन आठवड्याभरात पालकांना कळवले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी महेंद्र वानखेडे, सुनील चौधरी, प्रियंका चौधरी, नंदा भारंबे, चारु भोळे, सोनल महाजन, रुपाली नेवे, अनिता सुरळकर, वैशाली भगत, कैलास मेढे, पंकज बेंडाळे आदी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !