अमरावती-मुंबई आणि पुरी-अजमेर दरम्यान विशेष गाड्या
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अमरावती-मुंबई आणि पुरी-अजमेर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
अमरावती-मुंबई विशेष गाडी
अप 02112 अमरावती-मुंबई विशेष गाडी 25 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत अमरावती स्टेशनहुन सायंकाळी 7.10 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी मुंबईला 6.15 वाजता पोहोचणार आहे.डाऊन 02111 मुंबई-अमरावती विशेष गाडी 26 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत दररोज मुंबई स्टेशनहुन 7.55 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्या दिवशी अमरावतीला 7.55 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव व नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

पुरी-अजमेर विशेष गाडी
अप 02037 पुरी-अजमेर विशेष गाडी 21 जानेवारीपासून पुढील आदेशा पर्यंत दर सोमवारी व गुरुवारी पुरी स्टेशनहुन 11.05 वाजता रवाना झाल्यानंतर तिसर्या दिवशी अजमेर स्टेशनवर सायंकाळी 6.55 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 02038 अजमेर-पुरी विशेष गाडी 26 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवारी व गुरुवारीला अजमेर स्टेशनहुन सायंकाळी 6.50 वाजता रवाना झाल्यानंतर तिसर्या दिवशी पुरी स्टेशनला दुपारी 2.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, नांदुरा, मलकापूर, भुसावळ व जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
आरक्षीत तिकीट असल्यानंतरच प्रवेश
केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार असून प्रवाशांना कोविड 19 नियमांचे पालन करावे लागणार आहे.


