ठाणे ते मुलुंड दरम्यान 24 व 25 रोजी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक
भुसावळ : कोपरी रोड ओव्हर ब्रिजचे गर्डरचे काम करण्यासाठी ठाणे ते मुलुंड स्थानकां दरम्यानच्या 5 व 6 लाईन मार्गावर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक शनिवार व रविवारी (24 व 25 जानेवारी) रात्री एक ते साडेचार दरम्यान घेण्यात येणार असून दोन गाड्या रद्द तर सात रेल्वे गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
दोन गाड्या रद्द
23 व 24 रोजी 07058 सिकंदराबाद-मुंबई स्पेशल ट्रेन तसेच 24 व 25 रोजी 07057 मुंबई-सिकंदराबाद स्पेशल ट्रेन रद्द करण्यात आली आहे.

सात रेल्वे गाड्या दादरसह ठाणे व कल्याणला शॉर्ट टर्मिनेट
02541 गोरखपूर-एलटीटी स्पेशल ट्रेन 22 व 23 रोजी, 02810 हावडा-मुंबई विशेष ट्रेन 22 व 23 रोजी, 01142 आदिलाबाद-मुंबई विशेष ट्रेन 23 व 24 रोजी, 05267 रक्सौल-एलटीटी स्पेशल ट्रेन 23 रोजी, 02106 गोंदिया-मुंबई विशेष ट्रेन 23 व 24 रोजी, 02138 फिरोजपूर-मुंबई विशेष ट्रेन 22 व 23 रोजी, 02190 नागपूर-मुंबई विशेष ट्रेन 23 व 24 रोजी शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.


