वरणगाव तीर्थक्षेत्र नागेश्वर मंदिराच्या कामाला सुरुवात करा


जिल्हाधिकार्‍यांकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी

वरणगाव : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दोन कोटी 72 लक्ष मंजूर करून आणले होते. त्यातील 90 लक्ष रुपयांच्या कामांना सुरुवात करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी मुख्याधिकार्‍यांना दिल्यानंतर मुख्याधिकारी यांनी कामाचे टेंडर काढले तसेच कार्यारंभ आदेश पाच महिन्यांपूर्वी दिले होते मात्र संबंधित काम सुरू होण्यास ठेकेदाराकडून हलगर्जीपणा होत असून या प्रकाराला मुख्याधिकारी जवाबदार असल्याचा आरोप करीत कंत्राटदार काम सुरू करत नसल्यास व शासनाकडे हा निधी परत गेल्यास मुख्याधिकार्‍यांचा हलगर्जीपणा मानून त्यांच्याकडे निधीची वसुली करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

काम सुरू करण्यास मुख्याधिकारी असमर्थ
मंजूर निधीतून पहिल्या टप्यात सभागृहाचे काम करणे सक्तीचे आहे तसेच पहिल्या टप्याचे काम झाल्यानंतर नागेश्वर महादेव मंदिरासमोर गार्डन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, पेव्हर ब्लॉक, नागेश्वर मंदिर ते रेस्ट हाऊसर्यंत दुभाजक, रस्ता रुंदीकरण करणे तसेच वॉल कंपाऊंड तयार करणे यासह मंदिर परीसराचा विकास करण्यासाठी भरघोस निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे मात्र मंजूर झालेल्या निधीचे काम सुरू करण्यास मुख्याधिकारी असमर्थ ठरत आहे. निधी परत गेल्यास मुख्यधिकारी यांना जबाबदार धरण्यात यावे व सक्तीने त्यांच्याकडून हा निधी वसुल करण्यात यावा, अशी मागणी करीत तत्काळ सुरू न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष हाजी अल्लाउद्दीन सेठ, भाजयुमो शहाराध्यक्ष संदीप भोई, सरचिटणीस गोलू राणे, कुंदन माळी, आकाश निमकर, तेजस जैन, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष डी.के.खाटीक यांनी दिला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !