पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग
पुणे : कोरोनावरील कोविशील्ड लस तयार करण्यात आल्यानंतर देशभरात ओळख झालेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीमध्ये आग लागल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगीची माहिती जाणून घेतली. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून लस निर्माण करणारा भाग सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तिघा कर्मचार्यांची सुटका
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी भागात असलेल्या इमारतीत आगलागली. आग लागलेल्या भागात चार कर्मचारी अडकले होते त्यापैकी तिघांची सुटका करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली आहे. आग लागलेल्या भागात धुराचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत. आग नेमकी कुठे लागली आहे ते समजणं कठीण जात आहे. आग विझवल्यानंतर त्यामागील नेमकं कारण समजू शकेल, असं रणपिसे यांनी सांगितलं.


The incident of fire at the Serum Institute of India took place at Manjri Plant. It will not affect the production of vaccine: Sources pic.twitter.com/4Qq929xLIs
— ANI (@ANI) January 21, 2021