यावलला दक्षता समितीच्या बैठकीत पुरवठा यंत्रणा धारेवर

नामदार हरीभाऊ जावळेंचा संताप : विविध आरोपांनी गाजली सभा
यावल- अतिदुर्गम भागातील गोरगरीब जनतेच्या हक्काचे धान्य बहुतेक लोकांना मिळालेले नसल्याने रुईखेडा येथील तक्रारी आल्याने आणि गेल्या महिन्यामध्ये तांदळात आलेले प्रचंड दगड-गोटे यावरून दक्षता समितीची सभेत आमदार हरिभाऊ जावळे यांनी यावल पुरवठा विभागातील यंत्रणेला धारेवर धरले. यावल तालुका दक्षता समितीची सभा यावल तहसीलदार कार्यालयात आमदार जावळे यांच्या उपस्थितीत झाली.
आरोपांनी गाजली सभा
दक्षता समितीच्या सभेत नवीन रेशन कार्ड वेळेवर दिले जात नाही अनेकांची वशिल्याने काम होतात नव्हे तर अनेक अडचणींना जनतेला सामोरे जावे लागते सुविधा केंद्रामध्ये अवास्तव पैसे घेतले जातात, असे अनेक आरोप उपस्थितांनी दक्षता समितीत केले. यावरून आमदार हरिभाऊ जावळे यांनी संबंधित यंत्रणेला कडक शब्दात जाब विचारून गोरगरिबांच्या हक्काची अन्नधान्ये वेळेवर दिलेच पाहिजे आणि मागील महिन्यांमध्ये तांदूळात खूप मोठी घाण आली होती. चक्क भालोद गावांमधील तक्रार आमदार हरिभाऊ जावळे यांच्याकडे आलेली होती त्या महिलेने तक्रार केली म्हणून माझ्या कानावर तांदूळ खराब आला ही माहिती मिळाली मात्र यंत्रणेने याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही ही गंभीर बाब आहे, असे आमदार जावळे यांनी प्रशासनाला बजावले. गोरगरीब जनतेला माती मिश्रित दगड-गोटे मिश्रित तांदूळ विकत घ्यावे लागले ही बाब गंभीर असून असा तांदूळ आल्यास माझ्या कानावर टाकायला हवे होते किंवा दक्षता समितीच्या सदस्यांना सोबत घेऊन तहसीलदारांकडे अहवाल सादर्र करून त्याचा पंचनामा करून हा तांदूळ आपण परत पाठवला असता, असे सांगत त्यांनी गोडावून कीपर तडवी यांना चांगलेच धारेवर धरले. याप्रसंगी उज्जैनसिंग राजपूत, विलास चौधरी, हर्षल पाटील यांच्यासह दक्षता समितीचे मेंबर व नागरिक तसेच निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
