भादली-जळगावदरम्यानचे लेव्हल क्रॉसिंग गेट 23 व 24 रोजी बंद
भुसावळ : भादली-जळगाव दरम्यान असलेले समपार फाटक 23 व 24 रोजी भादली-जळगाव अभियांत्रिकी विभागातर्फे मेंटनन्स कार्यासाठी पहाटे सहा रात्री आठ दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. दोन दिवसात कि.मी.422/5-7 आणि 422/4-6 मध्ये कार्य केले जाणार असून समपार फाटक (लेव्हल क्रॉसिंग गेट) क्रमांक 149 बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनधारकांसह प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


