भुसावळसह रावेरला रविवारी टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी
भुसावळ : महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची 18 वी 19 वर्षाच्या आतील व 10 वी खुल्या (सिनियर) गटातील मुले/ मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा औरंगाबाद येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2021 दरम्यान होत आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी रविवार, 24 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता भुसावळातील बियाणी पब्लिक स्कूल मैदानावर तर रावेर येथे तर दुपारी 2.30 वाजता व्ही.एस.नाईक महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. 1 जानेवारी 2001 नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे व अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल (96731-71786) यांच्याशी संपर्क साधावा. खेळाडूंनी मैदावर येताना मास्क लावून येणे बंधनकारक असल्याचे जिल्हा क्रीडा महासंघटनेचे अध्यक्ष प्रा.आ.चंद्रकांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते, संघटनेचे उपाध्यक्ष शकील पटेल, डॉ.प्रदीप तळवलकर, प्रा.संजय चौधरी, प्रा.राजेश अंजाळे रुद्रसेन गंथीया, रमण भोळे, प्रदीप साखरे, बी.एन.पाटील, राजू कुलकर्णी, मधुकर वाणी, अजय डोळे, खुशाल देशमुख, प्रा.आसीफ खान, गोपाल जोनवाल, मेघशाम शिंदे, राहुल कोळी, प्रतीक कुलकर्णी, विकास पाटील, चेतन वानखेडे, तारीख अहमद यांनी केले आहे.


