सावदा पालिकेच्या सभेत 14 विषयांना मंजुरी


सावदा : सावदा पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवार, 21 रोजी ऑनलाइन पद्धतीने झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनिता येवले होत्या. सभेस नगरसेवक, नगरसेविका तथा मुख्याधिकारी सौरभ जोशी उपस्थि होते. सभेच्या अजेंड्यावर 16 विषय ठेवण्यात आले. यापैकी विषय क्रमांक पाच हा घनकचरा प्रकल्पास संरक्षक भिंत उभारणे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संकुलाचे फेस टू मधील वरील मजल्याचे बांधकाम करणे या दोन विषयावर चर्चा सुरू असताना नगरसेवक राजेश वानखेडे यांनी दोन्ही विषयांबाबतीत सदर कामाचे अगोदर इस्टिमेट तयार करावे व नंतर सभेसमोर मांडावे मगच त्यास परवानगी देण्याची भूमिका मांडल्याने या दोन विषयां व्यतिरीक्त 14 विषयांना सभागृहात मंजुरी देण्यात आली.

14 विषयांना मिळाली मंजुरी
सभेत शहरातील दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी वाटपाबाबत मंजुरी मिळाली. शहरातील सुमारे 197 दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांगत्वाच्या टक्के वारीनुसार आर्थिक मदत वाटप करण्यात येईल. ओम कॉलनीमधील पालिकेच्या ओपन स्पेसवर क्लब हॉलचे बांधकाम करणे, जलकुंभ बांधकामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास ना हरकत देणे, थोरगव्हाण रस्त्यावर गटारी बांधणे, पालिका ईमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे यासह बाकी विषयांना सभेत मंजूरी देण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !