मनापासून खर्‍या अर्थाने भक्ती करणार्‍यांना साक्षात्कार


डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज : ओंकारेश्वर मंदिरात भाविकांना प्रवचनात मार्गदर्शन

रावेर : मनापासून खर्‍या अर्थाने भक्ती करणार्‍या शिष्यांना साक्षात्कार होतो, असा विश्वास श्री सिद्धी विनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष युवा संत डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांनी व्यक्त केला. तालुक्यातील ओंकारेश्वर येथील मंदिराचे पूजारी पूज्य गुरुवर्य विश्वनाथ शास्त्री महाराज यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त ओंकारेश्वर मंदिरात आयोजित प्रवचनात भाविकांशी ते संवाद साधत होते. श्री सिद्धी विनायक मानव कल्याण मिशन व ओंकारेश्वर मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जिल्हा पोलिस अधीक्षकांची उपस्थिती
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या हस्ते रुद्रपूजा तर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पादुका पूजन व दीपप्रज्वलन करून प्रवचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, बोदवड बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, श्रीराम अग्रवाल, विजय गोटीवाले, भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, शीतल पाटील, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे, ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विक्रय पाटील, पंचायत समितीचे सभापती जितू पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केर्‍हाळा येथील माजी सरपंच राहुल पाटील यांनी महाप्रसादाचे आयोजन केल्याने त्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक मुंढे यांनी यावेळी सत्कार केला.

संतांच्या विचाराने सकारात्मकता
संत, गुरु यांच्या सुसंस्काराने, विचाराने माणसात आंतरीक बदल होतो. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. याचा चांगला परीणाम गुन्हेगारी कमी होण्यावर होत आहे. संतांचे, गुरुचे विचार नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारे असतात. संतांच्या विचाराची आज समाजाला गरज असून हे कार्य संत साहित्याचे अभ्यासक व युवा प्रचारक डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज करीत असल्याचे मत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !