हॉटेल लुटणार्‍या बाबा काल्यासह सहा जणांना न्यायालयीन कोठडी


भुसावळ : पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी चाकूच्या धाकावर धमकी देत टोळक्याने महामार्गावरील पंजाब खालसा हॉटेलमध्ये साहित्याची नासधूस करीत हॉटेल चालक सारंगधर महादेव पाटील (खडका रोड, भुसावळ) यांना ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी कुविख्यात बाबा काल्यासह सहा संशयीतांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीचा हक्क राखून ओळख परेडसाठी पोलिसांनी न्यायालयीन कोठडी घेतली.

आरोपींची न्यायालयीन कोठडी
हॉटेलमधील लूट प्रकरणी शेख रीजवान उर्फ बबलू शेख अशपाक (20, रा.मुस्लिम कॉलनी भुसावळ), परवेज हमीद कुरेशी (24, रा.आगाखान वाडा, भुसावळ), सय्यद वसीम सय्यद (33, रा.पंचशील नगर, भुसावळ, शेख नईम शेख सलीम (33, रा.दीनदयाळ नगर, भुसावळ), समीरउद्दीन अमिनोउद्दीन (25, रा.शनी पेठ, जळगाव) तसेच मुख्य आरोपी आसीफ उर्फ बाबा काल्या असलम बेग (25, रा.अयान कॉलनी, भुसावळ) यांना पोलिसांनी अटक केली होती. आरोपींची ओळख परेड करावयाची असल्याने पोलिस कोठडीचा हक्क राखत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !