सावखेडासीमच्या बेपत्ता शेतमजुराचा विहिरीत आढळला मृतदेह


यावल : तालुक्यातील सावखेडासीम येथील बेपत्ता शेतमजुराचा गुरुवारी सकाळी विहिरीत मृतदेह आढळला. यावल पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल धुडकू पाटील (45) असे मयताचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या केली की अन्य कारणाने त्यांचा मृत्यू झाला याबाबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. सावखेडासीम शिवारातील अजय दिलीप पाटील यांच्या शेतातील खोल विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. 19 रोजी सकाळी आठ वाजेपासून कुणालाही काही एक न सांगता ते घरातून बाहेर पडले होते. सर्वत्र शोध सुरू असताना त्यांचा विहिरीत मृतदेह आढळला. मयताचे मोठे भाऊ शंकर धुडकू पाटील यांनी यावल पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी मेहबूब तडवी करीत आहेत. मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.बी.बी.बारेला यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !