कंडारीतील कपिलेश्‍वर मंदिराचा ‘ब’ वर्गात व्हावा समावेश


भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकांचे विरोधी पक्ष नेत्यांना साकडे

भुसावळ : तापी नदी काठावरील कंडारी गावातील 500 वर्षांचा इतिहास असलेले अतिप्राचीन तीर्थक्षेत्र श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ‘ब’ वर्गात लवकरात-लवकर समावेश करावा, या आशयाची मागणी वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्र तज्ञ तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी नुकतीच विधान परीषद विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली.

मुंबईत दिले दरेकरांना निवेदन
कंडारी गावातील अतिप्राचीन तीर्थक्षेत्र श्री कपिलेश्वर महादेव मंदिर हे 2000-2001 मध्ये ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमा अंतर्गत ‘क’ वर्गात समाविष्ट झाल्याचे ग्रामविकास व जलसंधारण विभाग मार्फत जाहीर करण्यात आले होते .त्यानंतर मंदिर विश्वस्त मंडळाने2019 मध्ये सदर दर्जा ‘ब’ श्रेणीत वर्ग करण्यात यावा म्हणून शासन दरबारी पत्रव्यवहार केला आहे. शिवाय जळगाव वन विभागाद्वारे देवस्थान जमीन वनजमीन नसल्याबाबतचा अभिप्राय प्रमाणपत्र मिळावे यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जळगाव यांनीदेखील वन विभाग जळगाव यांच्याकडे केला आहे. आता तब्बल दोन वर्षे झाली हे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे हा प्रस्ताव रेंगाळत आहे. या विषयावर भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी विधानपरीषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबईला भेट घेत चर्चा केली आणि निवेदन सादर केले.


‘ब’दर्जा मिळस्तोवर शासन दरबारी पाठपुरावा
श्री कपिलेश्वर महादेव मंदिर, कंडारी, तीर्थक्षेत्राला 500 वर्षांचा ऐतिहासीक पार्श्‍वभूमी आहे. भगवान श्री कपिल ऋषी यांच्या पदस्पर्शाने हे गाव पावण झाले असून आगामी काळात तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करेल आणि समाजाला माहिती होण्यासाठी देखील प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !