नैराश्यातून नायगावात प्रौढाचा गळफास
यावल : तालुक्यातील नायगाव येथे एका 52 वर्षीय प्रौढाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडली. अजय सुधाकर देशमुख असे मयताचे ननाव आहे. नायगाव येथील रहिवासी अजय देशमुख यांचा गेल्या काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांचा पाय कापून टाकावा लागला. पाय नसल्याने ते गेल्या काही महिन्यांपासून निराश होते. त्याच नैराश्यातून त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


