सुशांतसिंह राजपूतच्या भावावर झाडल्या गोळ्या


नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसल्यानंतर सुशांतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकार्‍यांवर अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या झाडल्याने दोघांची प्रकृती गंभीर आहे. सुशांत सिह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह यांचं मधेपुरा येथे मोटारसायकल शोरूम आहे. मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात राजकुमार सहीत त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये सहकारी अमीर हसनची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सुशांतबाबात नोट सोशल मिडीयावर व्हायरल
सुशांतच्या निधनाला काही महिने होऊन गेल्यानंतर आता त्याची एक नोट तुफान व्हायरल होत आहे. आयुष्यातील 30 वर्षे काहीतरी बनण्याच्या प्रयत्नात घालवली पण नंतर कळलं खेळच चुकीचा आहे अशा आशयाची सुशांतची नोट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सुशांतची बहीण श्वेतासिंह कीर्ती नेहमीच त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने सुशांतने स्वतः लिहिलेली एक नोट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !