चाकूच्या धाकावर 23 लाखांचा एैवज लांबवला
जळगावातील घटना : बुरखाधार्यांच्या टोळीचा हैदोस
जळगाव : चाकूच्या धाकावर ठार मारण्याची धमकी देत व्यावसायीकाच्या घरातून चोरट्यांनी तब्बल 23 लाखांचा ऐवज लांबवल्याची घटना बुधवारी पहाटे शहरातील मोहाडी रस्त्यावर घडली.
बुरखाधारी गँगचा हैदोस
मोहाडी रस्त्यावर दौलत नगर परीरसरात पिंटू बंडू इटकरे (वय 35) हे लोखंडी सामानाचे व्यापारी पत्नी आणि मुलीसह वास्तव्यास असून बुधवारी पहाटे सव्वा तीन वाजता सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करीत इटकरे यांच्या सौभाग्यवती मनिषा इटकरे यांना तोंड दाबले तर पिंटू इटकरे यांना चाकू लाऊन घरात काय जे असेल ते काढून देण्यासाठी धमकावले. घाबरलेल्या इटकरे यांनी घरातील तीन लाखांची रोकड आणि 20 लाखांचे दागिने दिल्यानंतर दरोडेखोर पसार झाले. घेतल्यानंतर धमकावत हे सहाही जण निघून गेले. पाच दरोडेखोरांनी संपूर्ण चेहरा झाकला जाईल असा बुरखा घातला होता तर सहाव्याने तोंडावर विदूषकाचा मास्क लावला होता. सव्वा तीन ते चार वाजेपर्यंत ते इटकरे यांच्या घरात होते. येथून पलायन करतांना त्यांनी तळमजल्यावर लावलेल्या सीसीटिव्हीचा डीव्हीआर काढून घेतला. तर इटकरे पती-पत्नी या दोघांचा मोबाईल घेऊन फेकून दिला.


