सुरज झंवरच्या कार्यालयातील आमदार भोळे यांच्या नावाचे ते लेटरपॅड बनावट !
जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील संशयीत सुरज झंवर यांच्या कार्यालयात सापडलेले आमदार सुरेश दामू भोळे यांचे लेटरपॅड हे बनावट असून याचा आमदार सुरेश भोळे यांच्याशी संबंध नससल्याची माहिती भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे यांनी दिली. या प्रकरणात या पूर्वी सुद्धा सरकारी शिक्के आढळून आलेले आहे. सरकारी शिक्के बनावट बनू शकतात त्या ठिकाणी आमदारांचे बनावट लेटर पॅड बनवणे सहज शक्य आहे. बीएचआर घोटाळ्यात अटकेत असलेले आरोपी सुरज झंवर यांच्या कार्यालयामध्ये आमदार सुरेश दामू भोळे यांचे कोरे लेटर पॅड सापडले होते मात्र बीएचआर प्रकरणाशी आ. सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांचा कोणत्याही अर्थाने व कोणत्याही प्रकाराने संबंध नसल्याचे साखरे यांनी कळवले आहे.
