माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या याचिकेवर 17 रोजी सुनावणी
मुंबई : ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंनी याचिका दाखल केली असून या याचिकेवर 4 रोजी झालेल्या कामकाजानंतर आता या याचिकेवर 17 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. माजी मंत्री खडसे यांचे वकील इतर कामात व्यस्त असल्याचे कारण दाखवण्यात आले असून न्यायालयास वेळ मागून घेण्यात आला त्यामुळे एकनाथराव खडसे यांच्या पुढील सुनावणीचे कामकाज आता 17 फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.
