सामूहिक अत्याचारानंतर अल्पवयीन बालिकेची हत्या


नवी दिल्ली  : 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची दगडकाठ्यांनी मारहाण करत अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली तसेच तिच्या कुटुंबीयांची देखील हत्या करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात ही दुदैवी घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.

सहा आरोपींना अटक
कोरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेमरू पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्‍या गढुपरोदा गावात ही घटना घडली. 29 जानेवारी रोजी ही घटना घडली असतरी या घटनेची माहिती मंगळवारी समोर आली. त्या प्रकरणी संतराम मझवार (45), अब्दुल जब्बार (29), अनिल कुमार सारथी (20), परदेसी राम पनिका (35), आनंद राम पनिका (25) आणि उमाशंकर यादव (21) या आरोपींना अटक करण्यात आली असून सतरेंगा गावचे रहिवासी आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !