p>

भुसावळात सीमांकीत अभिन्यास मंजूरी रखडल्याने उपोषण


भुसावळ- शहरातील जुना सतारे भागातील शेतकरी कुंदन वासुदेव पाटील यांनी साकेगाव शिवारातील सर्वे नं.299/3, 301/1 व 306/4 या तिन्ही गटांचे तसेच भूषण नीळकंठ पाटील यांच्या 304/1 या गटाचे अभिन्यास मंजुरीचे प्रकरण वर्षभरापासून रेंगाळल्याने न्यायाच्या मागणीसाठी चौधरी व पाटील सात कुटूंबीयांनी गुरुवारी पालिकेसमोर उपोषण केले. दरम्यान या प्रकरणी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी स्थळ पाहणी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तूर्त उपोषण मागे घेण्यात आले.

स्थळ पाहणीच्या पत्रानंतर उपोषण मागे
साकेगाव शिवारातील सर्वे नं.299/3, 301/1 व 306/4 या तिन्ही गटांचे तसेच भुषण निळकंठ पाटील यांच्या 304/1 या गटाचे अभिन्यास मंजुरीचे प्रकरण वर्षभरापासून पालिकेत पडून आहे. या प्रकरणी संबंधीत दोन्ही शेतकरी तसेच त्यांचा कुटूंबीयांनी गुरुवारी पालिकेसमोर उपोषण केले. या प्रकरणी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी सर्वे क्रमांक 306/4 कागदपत्रांची पूर्तता नसल्याने तसेच अभियंता यांनी स्थळ पाहणी केली नसल्याने सदर प्रकरण नगररचनाकार यांनी तपासले नाही तसेच इतर दोन प्रकरणांबाबत संपूर्ण प्रकारची रीतसर पडताळणी करुन अभियंता, नगररचनाकार यांचा अभिप्राय घेवून योग्य तो निर्णय घेण्यात येणार असून तूर्त गणपती विसर्जनाची मिरवणूक, स्वच्छ सर्वेक्षणाची तयारी इत्यादी प्रशासकीय कामांमुळे सीमांकीत अभिन्यासातील स्थळ पाहणी झालेली नाही. स्थळ पाहणी झाल्यानंतर पुढील योग्य ती कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल, असे लेखी पत्र दिले यामुळे आंदोलकांनी उपोषण व आत्मदहनाचा इशारा तूर्त मागे घेतला मात्र दोन दिवसांत या प्रकरणी कारवाई न झाल्यास पून्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा कुंदन वासुदेव पाटील, भूषण भीळकंठ पाटील यांनी दिला आहे.


कॉपी करू नका.