नवजीवन एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला


चंद्रपूर-वर्धा दरम्यान घटना : भुसावळात गाडी आल्यानंतर प्रवाशांनी घातला गोंधळ

भुसावळ- साखरझोपेत प्रवासी असल्याची संधी साधून चोरट्यांनी 15 महिलांच्या पर्ससह प्रवाशांच्या बॅगा लांबवत लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी पहाटे चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस भुसावळ आल्यानंतर उघड झाली. या घटनेनंतर प्रवाशांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर चांगलाच गोंधळ घातला. एकाचवेळी अशा पद्धत्तीने चोरी झाल्याने मोठी टोळी एकाचवेळी कार्यरत झाल्याचा संशय आहे. य प्रकरणीलोहमार्ग पोलिस ठाण्यात शुक्रवारी सकाळी तीन महिलांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल तर सुमारे तासभर प्रवाशांनी भुसावळात गाडी रोखून धरल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली.

अकोल्याापासून प्रवाशांनी घातला गोंधळ
शुक्रवारी चंद्रपूरकडून अहमदाबादकडे जाणार्‍या नवजीवन एक्स्प्रेसमधील प्रवासी साखर झोपेत असतांना चोरट्यांनी महिला प्रवाशांच्या लेडीज पर्स लांबवल्या. काही प्रवाशांना अकोल्यात प्रवाशांना जाग आल्यावर त्याच्या पर्स गायब झाल्याचे आढळल्याने त्यांनी अकोल्यात तक्रारी दिल्यात तर काही स्थानक सुटल्यानंतर जाग आल्यानंतर त्यांनी गोंधळ घातला. तीन ते चार डब्यातील प्रवाशांच्या पर्स चोरीला गेल्याची घटना संपूर्ण गाडीत कळाल्याने भुसावळ जंक्शन स्थानकावर शुक्रवारी सकाळी प्लॅटफॉर्म चारवर गाडी आल्यानंतर प्रवाशांनी गाडीच्या खाली उतरत तीव्र संताप करीत गोंधळ घातला. तत्पूर्वी गाडीतील तिकीट निरीक्षक शेखर यांना प्रवाशांनी दिल्याने त्यांनी कंट्रोल विभागाला माहिती दिल्याने गाडी जंक्शनवर येण्यापूर्वीच आरपीएफ, जीआरपी पोलिसांचे पथक स्थानकावर तैनात करण्यात आले.

भुसावळात तीन गुन्हे दाखल
नवजीवन एक्स्प्रेस भुसावळ जंक्शनवरील प्लॅटफॉर्म चारवर सकाळी शुक्रवारी 9.12 वाजता आल्यानंतर स्टेशन डायरेक्टर जी.आर. अय्यर, स्टेशन मास्तर मनोज श्रीवास्तव, आरपीएफचे निरीक्षक दिनेश नायर यांच्यासह जीआरपीचे निरीक्षक दिलीप गढरी त्यांचे कर्मचारी, आरपीएफचे जवान उपस्थित होते. त्यांनी यावेळी जीआरपी पोलिसांनी तक्रारदारांच्या तक्रारींची नोंद केली. चेन्नई ते सुरत प्रवास करणार्‍या महिला प्रवासी मुनीरा कोठारी (रा.सूरत) यांचे पहाटे पाच वाजेच्या सुमारास दोन मोबाईल चोरीला गेले तसेच 15 हजार रुपये चोरट्यांनी लांबवले तर दुसरी तक्रार सकीना हासीम पटेल (रा. गोध्रा, गुजराथ) व सईल बोरी (रा. नळगाव) यांनी नोंदवली. पहाटे दिड वाजेच्या सुमारास त्यांची पर्स चोरीला गेली. सकीना पटेल यांचे एक हजार 500 रुपये रोख तर सईल बोरी यांचे 500 रुपये रोख, एटीएम कार्ड, आधारकार्ड असा ऐवज चोरीला गेला. हे गुन्हे अकोला तसेच वर्धा लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.


कॉपी करू नका.